Naamvistaar din status|नामविस्तार दिवस स्टेटस

मराठवाड्याच्या मातीचा इतिहास महान,
संघर्षाने सजलेला प्रत्येक जवान।
बाबासाहेबांच्या नावाचा जप केला,
त्यासाठी कित्येकांनी स्वतःचा बलिदान दिला।

प्राण गमावले, पेटले जिवंत,
तरीही सोडला नाही सत्याचा अंत।
भिमाच्या लेकरांनी ठरवलेच होते,
विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव पाहिजेच होते

विद्यापीठाला नाव देण्याचा आहे जर निर्धार,
तर करावाच लागेल आणखी प्रखर प्रचार।
सत्यासाठी संघर्षाची ज्योत तेवत ठेवा,
बाबासाहेबांच्या विचारांची शिकवण पुढे नेवा।

संघर्षाचा तो दिवस सोनेरी ठरला,
बाबासाहेबांच्या लेकरांनी विजय मिळवला।
विद्यापीठावर झळकले नाव ते महान,
डॉ. बाबासाहेबांचा झाला अभिमान।

घाम, रक्त आणि बलिदान फळाला आले,
सत्याच्या लढ्याने तो घोर अंधार हटवले।
तो विजय नव्हता फक्त नावाचा,
तो होता इतिहास घडणाऱ्या उद्याच्या भविष्याचा। 💪

Jay Bhim Jay savidhan

जखमा आमच्या इतिहासाच्या साक्षीदार,
शब्दांची तलवार, हक्काची तलवार।
संघर्ष फुलला, विजयी ध्वज हवा,
आता फक्त विजयाच्या गोष्टिचा सांगावा।

आधार हा बाबासाहेबांचा विचार आहे
त्यांच्या नावासाठी हे वीरमरण स्वीकारल आहे।
ज्यांनी रक्त दिलं, त्यांची गाथा अजून जिवंत आहे,
आजच्या पिढीला त्यांचा आवाज अजून महत्त्वपूर्ण आहे

भिमाच्या लेकराला, शहिद झालेल्या वीराला,
आमचा साष्टांग प्रणाम, त्याच्या बलिदानाला!🙏🙏

भले त्या वेळेस आमच्या घरात पीठ नसेल ही,
पन हातात समोरच्या ला झुकायला लावनार बळ होत।
इतिहासाच्या पानावर तेच असतात, जे कसल्याही परिस्थिति ला न जुगारता खंबीर पने मैदानात उभे राहतात।

संघर्ष आमचं अस्त्र होतं, आणि बाबासाहेब आमचं प्रेरणास्थान. ज्यांनी बाया सारखे पीठा चे टोमणे मारले,
त्याला इतिहासाने उत्तर दिलं।
17 वर्षांच्या संघर्षानंतर बाबासाहेबांचं नाव विद्यापीठावर कोरलं, हा सुद्धा आमच्या भिमाच्या लेकरांच्या शौर्याचा दिवस आहे।

घरात पीठ असो किंवा नसो, विद्यापीठ आमचं होतं आणि राहील. कारण संघर्षाने जिंकलेला हक्क कोण काढून घेऊ शकत नाही! जय भीम

ज्यांनी आम्हाला हिनवलं, त्यांना सांगून ठेवा – आमचा संघर्षच आमची ओळख आहे, आणि बाबासाहेबांचं नाव आमची शान आहे! जय भीम!

आमचं घर गरीब असलं तरी आणि आमच्या घरात पीठ नसल तरी..आम्हची स्वप्नं मोठी होती. आणि तो संघर्ष मराठवाडा विद्यापीठावर बाबासाहेबांचं नाव घेऊन उभं आहे! जय भीम

त्या वेळेस भले नव्हता आमच्या कड़े पैसा भले नसु दे आमच्या कड़े पीठ..
होती ति फक्त जिद्द। आणि ति जिद्दच पुरेशी होती💪
क्रांतिकारी जय भीम

बाबासाहेबांचं नाव विद्यापीठावर येण्यासाठी 17 वर्षं संघर्ष केला, प्राण दिले, पण स्वाभिमान विकला नाही! जय भीम

ज्यांनी स्वतःला पेटवलं, त्यांची ज्वाला आजही आमच्या रगांत आहे.
तेव्हा घेतलेला हक्क आजही आमच्या स्वाभिमानाचा भाग आहे! जय भीम!”

आमचं रक्त सांडलं, पण आम्ही हरलो नाही. बाबासाहेबांचं नाव विद्यापीठावर आहे, हे आमचं विजयाचं चिन्ह आहे! जय भीम!”

नामविस्तार दिनाच्या सर्व भारतीयाना हार्दिक शुभेच्छा🍃

Naamvistaar din status|नामविस्तार दिवस स्टेटस

Leave a Comment